#मंत्रिमंडळाचा विस्तार
Explore tagged Tumblr posts
Text
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कुणाला संधी मिळण्याची शक्यता? मोठी बातमी समोर
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा विस्ताराकडे लागल्या आहेत. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत, त्याप्रमाणं लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची…
View On WordPress
#Cabinet Expansion#CM Eknath Shinde#Eknath Shinde#Maharashtra News#Marathi News#मंत्रिमंडळाचा विस्तार
0 notes
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !
कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला व��दन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा ���्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेक���, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
*संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*
*"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*
*मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*
*आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."*
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार-३३ कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री-मराठवाड्यातल्या सहा जणांचा समावेश • एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार • परभणी हिंसाचार प्रकरणातला आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा उपचारादरम्यान मृत्यू आणि • बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात ४४५ धावांवर सर्वबाद
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु होत आहे. या अधिवेशनात २० विधेयकांवर सदनात चर्चा होईल, यापैकी १४ अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्यांचं विधेयकात रुपांतर करण्यात येणार आहे. तर सहा नवीन विधेयकं मांडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून, राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाबद्दल विचारलं असता, सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचं मूल्यांकन करणार असून, जे मंत्री योग्य काम करत नसल्याचं लक्षात येईल, त्यांच्याबद्दल पुनर्विचार केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले… “हम पर्फोमंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और पर्फोमंस ऑडिट मे जहां ये ध्यान मे आएगा की मंत्री उचित काम नही कर ��हे हैं, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा.’’ बीड जिल्ह्यातल्या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, सर्वसामान्य जनता आणि राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं सांगितलं तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विरोधकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूवर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. बीडमध्ये सरपंचासह वर्षभरात ३२ हत्या प्रकरणं, परभणीतली अप्रिय घटना, या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी, या नेत्यांनी यावेळी केली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली, ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले: “तीन-तीन आठवड्यांचं एकेक महिन्यांचं होणारं अधिवेशन आता पाच दिवसांवर आणि सहा दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. आणि त्याच्यातच कोणत्याही प्रकारे लक्षवेधी नाही, प्रश्न उत्तरे नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये भलेही छोटं अधिवेशन असेल पण एक विरोधी पक्ष म्हणून ताकदीने या सरकारच्या सगळ्या कारभाराला, स्थितीला विरोध करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे.’’ विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद द्यावं, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला. नागपूर इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ३३ जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर सहा जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, अशोक उईके, आशिष शेलार, जयकुमार गोरे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, यांच्यासह सर्वाधिक १९ मंत्री, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसा��, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, यांच्यासह ११ मंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव पाटील यांच्यासह नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक, शिवसेनेचे योगेश कदम, तर अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह सहा जणांना राज्य मंत्रिपदाची शपथ दिली. “नागपुरात सुमारे साडे तीन दशकांनंतर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात काही माजी मंत्र्यांचं राजकीय पुनर्वसन आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले, पंकज भोयर, नितेश राणे अशा नवीन चेहऱ्यांचा समावेश, ही या मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये ठरली. मराठवाड्यातल्या सहा जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. गेल्या विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विधान परिषदेवर गेलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे, गेल्या सलग दोन मंत्रिमंडळात स्थान मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे या अनुभवी मंत्र्यांसह औरंगाबाद पश्चिमचं सलग चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, जिंतूर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर साकोरे, आणि लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात प्रथमच स्थान मिळालं आहे.’’
एकूण चार महिला मंत्र्यांचा समावेश असलेल्या या या मंत्रिमंडळात गेल्या वेळी मंत्रिमंडळात असलेले भाजपचे रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आश्वासनं दिली, तरीही मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान दिलं नसल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सादर करतील. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्च स्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, राज्यसभेत आज आणि उद्या संविधानावर विशेष चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून नागरीकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११७वा भाग असेल.
परभणी हिंसाचार प्रकरणातला आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा काल जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्राचे उप पोलीस महासंचालक शहाजी उमाप यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात जमाव झाला होता, परभणी शहरासह पूर्णा शहरात तसंच जिल्हाभरात तणाव निर्माण झाला असून, बाजारपेठ, बस सेवा बंद करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी याचं शव विच्छेदन छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात करण्यात यावं, तसंच मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत देऊन कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी, आमदार राहुल पाटील यांनी केली. जिल्हा रुग्णालयात पाहणीसाठी आल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ४४५ धावांवर सर्वबाद झाला. जसप्र��त बुमराहनं सहा, मोहम्मद सिराजनं दोन, तर नितीश कुमार रेड्डी आणि रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद सहा धावा झाल्या होत्या.
गोव्यात पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या १५ खेळाडूंनी सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि एक कांस्यपदक अशा १७ पदकांची कमाई केली. हे सर्व खेळाडू बीड जिल्हा क्रीडा संकुलातले डॉ. अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातले खेळाडू आहेत. देशभरातल्या ८०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं सहा पूर्णांक चार दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून, काल सर्वाधिक निचांकी चार पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची काल सांगता झाली. तहसीलदार विलास तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत होमहवन आणि महापूजा करून पूर्णाहुती दिली. त्यानंतर सायंकाळी श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात आली. यावर्षी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस पाच ते सहा हजार महिला आराध बसल्या होत्या.
0 notes
Text
महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 15 (शिबिर कार्यालय) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात…
View On WordPress
0 notes
Text
नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? असंतुष्टांची नाराजी दूर होणार
https://bharatlive.news/?p=161864 नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? असंतुष्टांची नाराजी दूर ...
0 notes
Text
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य!
मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडलेला नाही. यावर आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने (Goverment) दाखवून दिलं, असं बच्चू कडू म्हणालेत. सभेने मत जिंकली जातात, असं नाही. सभा ही फक्त शक्ती प्रदर्शनासाठी असते. शक्ती प्रदर्शनासोबत कर्तव्याची जोड पाहिजे. तुमचं कर्तव्य जर नसेल तर सभेला काहीच किंमत नाही. काम बघून लोकं मत देतात सभा पाहून नाही. महविकास आघाडीचं कर्तृत्व शून्य आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केलीये. दरम्यान, शिंदे सरकार आल्यानंतर बच्चू कडू पुन्हा मंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार पार पडला नाही. यावरून बच्चू कडूंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा, सर्व लिपिकांची रिक्त पदे भरणार, मंत्रीमंडळ बैठकीत ११ महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Meeting Decisons CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis sgy 87
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा, सर्व लिपिकांची रिक्त पदे भरणार, मंत्रीमंडळ बैठकीत ११ महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Meeting Decisons CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis sgy 87
राज्य मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले ११ महत्त्वाचे निर्णय १) धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा, अतिरिक्त सवलतीही…
View On WordPress
0 notes
Text
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर पुन्हा होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, २३ मंत्री घेणार शपथ!
गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासोबतच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही घोषणा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच होणार आहे. या कॅबिनेट विस्तार त्यानंतर लगेचच गणेशोत्सव होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
View On WordPress
0 notes
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
View On WordPress
0 notes
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
View On WordPress
0 notes
Text
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? या नेत्याने सांगितली तारीख
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला सरकारची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसांनी झाला होता. त्यानंतर अनेक दिवस खातेवाटपही झाले नव्हते. खातेवाटप झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. कारण मंत्रिमंडळात २८…
View On WordPress
#Amaravati news#Bacchu kadu#Cabinet Expansion#Eknath Shinde#Maharashtra#Marathi News#मंत्रिमंडळाचा विस्तार
0 notes
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, मराठवाड्यातल्या पाच जणांसह एकूण ३९ मंत्र्यांना शपथ.
मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष संधी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून, सरकारने आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार.
आणि
उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
****
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. नागपूर इथं सुरु असलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महायुतीच्या ३९ मंत्र्यांना शपथ देत आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, ��ंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी शपथ घेतली. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील यांनी शपथ घेतली.
मराठवाड्यातल्या पाच जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी समीर पाठक यांनी घेतलेला हा आढावा...
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील घटकपक्षांमध्ये तसेच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाड्यातून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, धनंजय मुंडे, संजय सिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तर, गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली आहे, त्यांचाही राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी येथील आमदार धनंजय मुंडे यांनी सलग तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळात स्थान पटकावले आहे. तर, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेले शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
नागपुरात सुमारे तीन दशकांनंतर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात काही माजी मंत्र्यांचं राजकीय पुनर्वसन आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले, मेघना बोर्डीकर, संजय शिरसाट, नितेश राणे अशा अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश, ही या मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये ठरली.
****
मंत्री पंकजा मुंडे यांनी या सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा मंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या...
मला खूप आनंद आहे, तो आनंद माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या सतत माझ्याबरोबर संघटन त्यांचं उभ करण्यामुळे आहे. चौदामध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा, तेव्हाही मी त्यांच्या टीम मध्ये होते आणि आताही त्यांच्या टिम मध्ये आहे. याचा मला आनंद आहे.
****
मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झालं असून, मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष संधी देण्याचं ठरलं आहे. त्यामुळे आज शपथ घेतलेले मंत्री अडीच वर्षांसाठी असतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. लवकरच तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून, परभणी मध्ये दलित तरुणाची झालेली हत्या, यासोबतच बीडमध्ये गेल्या वर्षभरात ३२ जणांची झालेली हत्या, या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी, या नेत्यांनी यावेळी केली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली आहेत, ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी या पत्रकार परिषदेत केली.
विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद द्यावं, अशी मागणी, जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी केली.
****
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयकदेखील उद्या संसदेत सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गेल्या गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याविषयीच्या विधेयकाला मंजुरी दिली होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्च स्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता.
****
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य, राष्ट्राची एकता, अखंडता तसंच, विकसित भारताची संकल्पपूर्ती याकरता देशवासीयांसाठी प्रेरणास्थान राहील, असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून नागरीकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११७वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २७ तारखेपर्यंत, १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून, आज सर्वाधिक नीचांकी तापमान चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने ही माहिती दिली. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणारं थंड वारं तसंच आपल्या भागात असलेलं कोरडं वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे विषय विषयतज्ञ प्राध्यापक अशोक निरवल यांनी हवामानाच्या अंदाजाबद्दल माहिती दिली.
उत्तरेकडील येणारे जे थंडीच्या वाऱ्याचा प्रवाह तीव्र झालेला असल्यामुळे आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून हे प्रणाली विरून जाण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावरील असलेल्या चक्राक��र वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती होण्याची संकेत आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे येतानाही प्रणाली आणखी तीव्र होणार असून त्याचाच परिणाम म्हणून राज्यात गारठा वाढला असून पुढील तीन ते चार दिवस हा गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सात बाद ४०५ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराहनं पाच गडी बाद केले.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची आज सांगता झाली. तहसीलदार विलास तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत होमहवन आणि महापूजा करून पूर्णाहुती दिली. त्यानंतर सायंकाळी श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात आली. यावर्षी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस पाच ते सहा हजार महिला आराध बसल्या होत्या.
****
बीड इथं आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत घेण्यात आली. यात जिल्ह्यातून सुमारे १२ कोटी ९८ लाख रकमेची दोन हजार ३९३ प्रकरणं निकाली काढण्यात आली.
****
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात रुपटॉप सोलरचे ७ हजार ९२६ अर्ज मंजूर झाले असून, दोन हजार ११५ जणांचं काम पूर्ण झाल्याची माहीती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. या योजनेच्या जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. ही योजना सोलापूर जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी वीज वितरण कंपनीने योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
सिकलसेल जनजागृती अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यात २००९ पासून जवळपास १३ लाख ९६ हजार ३५३ इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करणात आल्या. त्यात २४ हजार २२८ वाहक आणि एक हजार ६०६ सिकलसेल ने ग्रसित रुग्ण आढळून आले.
****
0 notes
Text
' त्या ' बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
‘ त्या ‘ बंडखोर आमदारावर आता गुप्तचर यंत्रणेची नजर ?, मंत्रिपद मागाल तर ..
राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यामध्ये अनेक बंडखोर आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र अवघ्या अठरा मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे उर्वरित मंत्री नाराज असल्याचे चित्र आहे. नाराज आमदार यांनी एकमेकांशी संपर्क साधने सुरू केलेले असल्याने त्यांच्यातील हालचालीवर गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले…
View On WordPress
0 notes
Text
Expansion of the State Cabinet ऑगस्टमध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
https://bharatlive.news/?p=115088&wpwautoposter=1691035495 Expansion of the State Cabinet ऑगस्टमध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्य ...
0 notes